Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

बोपदेव घाटात अपघात

marathinews24.com 

पुणे – बोपदेव घाटात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भरधाव बसने एका मोटारीला धडक दिली. अपघातात मोटार चालकासह त्याचे कुटुंबीय किरकोळ जखमी झाले. अभिषेक अर्जुन मोरे (रा. काॅसमाॅस सोसायटी, ताथवडे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी खासगी बस चालक बंदगीशहा खादीर मुलाणी (वय ५०, रा. मुलाणी गल्ली, मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भगवान रत्नाकर पाटील (वय ५४, रा. उदयनगर, माळशिरस, जि. सोलापूर) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचे बस्तान – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार चालक पाटील हे कुटुंबीयांसोबत ८ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास मूळगावी निघाले होते. बोपदेव घाटात कांचन हाॅटेलजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसने मोटारीला धडक दिली. त्याानंतर तेथून निघालेले दुचाकीस्वार अभिषेक मोरे यांना धडक दिली. अपघातात मोटार चालक पाटील आणि कुटुंबीयांना दुखापत झाली. अपघातात गंभीर झालेल्या मोरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर खासगी बस चालक याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसांनी नोटीस बजावली. सहायक पोलीस निरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

एसटी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

वाघोली परिसरात एसटी बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. सिद्धार्थ एकनाथ कांबळे असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत सविता कोंडीराम कांबळे (वय २६, रा. पाचंगे वस्ती, शिरुर, जि. पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ कांबळे हे ८ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाले होते. वाघोलीतील कटकेवाडी परिसरात भरधाव एसटी बसने कांबळे यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×