Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भेकराईनगरात टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

चालकाविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात १७ डिसेंबरला दुपारी पावणे चारच्या सुमारास हडपसर परिसरातील सासवड रोड, भेकराईनगरात झाला होता. याप्रकरणी टेम्पो चालकाविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताच्या बतावणीने मोटार चालकाला लुटले – सविस्तर बातमी  

मनोहर वामनराव धर्माधिकारी (वय ५७ रा. नेहरूनगर, पिंपरी-चिंचवड) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांच्या पत्नी उषा धर्माधिकारी (वय ४८) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मनोहर धर्माधिकारी हे पिंपरीतील नेहरूनगर परिसरात राहायला होते. १७ डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास ते सासवड रस्त्यावरील भेकराईनगरातून जात होते. त्यावेळी भरधाव वेगातील टेम्पो चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे मनोहर हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खंदारे तपास करीत आहेत.

पेन्शनकार्ड काढून देण्याची बतावणी, ९ लाखांची फसवणूक

पेन्शनकार्ड काढून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी सदाशिव पेठेत राहणार्‍या ७८ वर्षीय जेष्ठाला तब्बल ९ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १७ ते १८ डिसेंबर २०२५ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ७८ वर्षीय जेष्ठाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरूण घोडके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×