महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू
marathinews24.com
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. या हल्ल्यात सुमारे २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा देखील समावेश आहे. पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे देखील या हल्ल्यात बळी पडले आहेत.
पुणे रस्त्यावरील खोदकामामुळे ५० ठिकाणी वाहतूक कोंडी – सविस्तर बातमी
या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली अलका टॉकीज चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेली कौस्तुभ गनबोटे यांची बहीण अर्चना देवधर देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या दरम्यान त्यांनी त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या.