Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

युट्यूब पाहून बनवला बॉम्ब; आरोपीला नागपूरमधून अटक

हॉस्पिटलकडून खंडणीचा होता डाव; हडपसर बॉम्ब प्रकरण

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसरमध्ये खासगी रूग्णालयात जिवंत बॉम्ब ठेवणार्‍या आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेत अटक केली. शिवाजी राठोड (वय ३१, रा. मांजरी, पुणे, मूळ- सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने युट्यूब पाहून ४०० रूपयांत बॉम्ब बनवल्याचे उघडकीस आले आहे. रूग्णालयाकडून खंडणीचा डाव रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यासाठी त्याने रूग्णालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एसटी प्रवासात महिलेचे ८ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

हडपसरमध्ये रूग्णालयात बॉम्ब ठेवलेला आरोपी शिवाजी राठोड हा रेल्वेने नागपूरच्या दिशेने पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजनुसार स्पष्ट झाले होते. त्यानुसार एटीएसने अकोला पोलिसांशी संपर्क करून राठोडला मूर्तिजापूरात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर एटीएस पथकाने नागपुरात रेल्वे स्टेशनवर त्याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस त्याला घेऊन पुण्यात पोहचणार आहेत. दरम्यान, बॉम्ब ठेवण्यात कोणताही दहशतवादी प्रकार नाही. हे सर्व त्याने एकट्यानेच केले आहे. प्रथमदर्शनी तपासामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यानंतर सर्व माहिती येणार आहे.

आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही

आरोपी राठोडची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून, त्याच्या मांजरीतील घरझडती प्रक्रिया पुर्ण झाली आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपी एकटाच होता. १० मे रोजी तो वैयक्तिक तपासणीसाठी हडपसरमधील रुग्णालयात गेला होता. त्याठिकाणी त्याच्या उपचारासाठी लाखोंचा खर्च सांगण्यात आला. त्यानंतर त्याने पैसे नसल्यामुळे रूग्णालयाकडून खंडणीचा डाव रचून बॉम्ब ठेवण्याचे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.

युट्यूब पाहून बनवला बॉम्ब

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासासह तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी शिवाजी राठोड याचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या घरात एक घड्याळाचे काटे मिळाले होते. ते बॉम्बशी निगडीत होते, म्हणून पोलिसांचा संशय बळावला. प्राथमिक तपसानुसार खंडणीसाठी त्याने हे कृत्य केले आहे. त्याने युट्यूब व्हिडिओ पाहून ऑनलाइन बॉम्ब बनवला. बॉम्ब होता पण त्यामध्ये मोठे स्फोटक पदार्थ काही नव्हते, असेही आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

मूळचा सोलापूरचा, मांजरीत कपडे,बुटविक्रीचे दुकान

आरोपी राठोड मुळचा सोलापूरचा असून, पुण्यातील मांजरी भागात त्याचे कपडे आणि शु विक्रीचे दुकान आहे. त्याच परिसरात तो राहायला आहे. त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून बॉम्बसदृश्य वस्तू बनवण्याच्या वस्तू विकत घेतल्या आहेत. दरम्यान, हॉस्पीटल सुरक्षाबाबत आम्ही प्राधान्य दिले असून, पोलिस काळजी घेत आहे. आरोपी हा हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याच्या तयारीत होता, त्यांनी खंडणी धमकी दिली नव्हती.

४०० रूपयांत बनविला बॉम्ब, घरात २ किलो गांजा

बॉम्ब बनवण्यासाठी आरोपीने युट्यूबवर व्हिडिओ पाहून वस्तुंची जमवाजमव केली. अवघ्या ४०० रुपयात त्याने बॉम्ब सदृश वस्तू बनवली आहे. त्यामध्ये डिजिटल घड्याळ, चार पाईप, चिकटटेप, लाल-काळी वायर असे एकत्रित करून असा बॉम्ब बनवला. आरोपी राठोडच्या घरात २ किलो गांजा मिळून आला आहे, त्याचा तपास ही केला जात आहे. तो रेल्वेने नागपूरमधून पुढे हावडामार्गे नेपाळ जाणार होता. त्याठिकाणी त्याची बहीण राहयला आहे. हिंदुस्थानात उन्हाळा जास्त आहे, म्हणून तो बहिणीला नेपाळमध्ये येतो असे म्हणाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

बॉम्बसदृश्य वस्तू बनविण्यासाठी आरोपीने विविध दुकानांसह ऑनलाईन वस्तूंची खरेदी केली आहे. त्यानंतर युट्यूबवरील व्हिडिओ पाहून बॉम्बसदृश्य वस्तू बनवली. सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी शिवाजी राठोड याला नागपूरला ताब्यात घेतले आहे. नागरिकांची सुरक्षितता आमची जबाबदारी असून, पोलीस दल सक्षम आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×