Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

तहसील कार्यालयात लाच घेणाऱ्या दलालाला पकडले

Pune ACB trap

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणात तहसीलदारांचा आदेश मिळवून देण्यासाठी एकाकडून २५ हजारांची लाच घेणाऱ्या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात बुधवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी विजय मल्हारी खळदकर (वय ५७, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

पुण्यात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद – सविस्तर बातमी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची वडिलापार्जित जमीन पुरंदर तालुक्यात आहे. या जमिनीच्या असमान हिस्साची सुनावणी सासवड येथील तहसीलदार कार्यालयात सुरू होती. २४ जून रोजी तहसीलदारांनी वादी आणि प्रतिवादी यांना समान संधी देऊन हे प्रकरण बंद केले. मात्र, याबाबत तहसीलदारांनी आदेश दिले नव्हते. त्यानंतर सासवड येथील तहसीलदार कार्यालयात २९ ऑगस्टला तक्रारदार गेले. तेव्हा खळदकर त्यांना भेटले. हे प्रकरण तहसीलदारांसमाेर ठेवण्यासाठी खळदकर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (२ सप्टेंबर) सासवड येथील तहसीलदार कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार तेथे गेले. त्यांनी खळदकर याची भेट घेतली. तेव्हा या प्रकरणात तहसीलदारांचे आदेश मिळविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. खळदकर याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आली. सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी सायंकाळी भष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन खळदकरला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके, पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे, हवालदार बाळासाहेब गदादे, दीपक काकडे, रवी दिवेकर यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×