मोठ्या भावाच्या खून प्रकरणात आरोपी भावाला शिक्षा
marathinews24.com
पुणे – दारु पिऊन आई- वडिलांना सतत त्रास दिल्यामुळे समजावून सांगत असताना झालेल्या भांडणातून मोठ्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावणी आहे. निलेश बबन बाेरकर (वय ३१) यास शिक्षा सुनावण्यात आली आहे.मंगेश बबन बाेरकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४३ लाखाची फसवणूक – सविस्तर बातमी
उरळी देवाची परिसरातील काेंडेवस्ती याठिकाणी १९ जानेवारी २०२० राेजी मद्यपान वादातून भांडण झाले. त्यामुळे छाेटा भाऊ समजावून सांगत असताना, त्याने माेठया भावाच्या डाेक्यात दगडी पाटा मारुन त्याचा निघृण खून केला. याप्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी रत्नमाला बबन बाेरकर (वय-५३) यांनी लाेणीकाळभाेर पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. तक्रारदार मजुरीचे काम करत असून, त्यांचे पती बबन बाेरकर, माेठा मुलगा मंगेश हे काेंडेवस्ती, उरळीदेवाची येथे राहत हाेते. तर छाेटा मुलगा निलेश व त्याची पत्नी श्वेता हे काळेपडळ, हडपसरमध्ये राहायला हाेते.
माेठा मुलगा मंगेशला दारुचे व्यसन हाेते. ताे काम न करता घरी दारु पिऊन त्रास देत हाेता. त्यामुळे निलेश त्याला सातत्याने सांगत हाेते. १९ जानेवारी २०२० रोजी रात्री नऊ वाजता मंगेश घरी होता. मंगेश व निलेश हाॅलमध्ये बसले असताना, निलेश हा मंगेशला समजवून सांगत हाेता. त्यावरुन त्यांच्यात शिवीगाळ सुरु झाली. त्यावेळी तक्रारदार व श्वेता या दाेघी तेथे येऊन त्यांनी दाेघांना समजवून सांगण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु दाेघांची भांडणे वाढत गेली असता, निलेशने माेठा भाऊ मंगेशच्या डाेक्यात दगडी पाटा घालून खून केला. गुन्हयाचा तपास तत्कालीन पाेलीस निरीक्षक (सध्या नियुक्ती मुंबई) स्वप्नील लाेखंडे यांनी केला. तर प्रभारी अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी काम पाहिले. सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी साक्षीदारांचे जबाब नाेंदवले न्यायालयीन कामकाजात महिला पाेलीस हवालदार ललिता सिताराम कानवडे यांनी सहकार्य केले.