Breking News
बाह्यवळण मार्गावर तरुणाला धमकावून रोकड लुटलीबँकेत गोंधळ घालून व्यवस्थापकाला शिवीगाळटोळक्याकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्कीओैषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याकडून १० लाखांचा अपहारडाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदलमुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शनछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभश्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंदएआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरजकीड व्यवस्थापनावर डिजिटल शेतीशाळेचे आयोजन

श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये कोथरुडकर वारकऱ्यांसाठी भवन

श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये कोथरुडकर वारकऱ्यांसाठी भवन

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

marathinews24.com

पुणे – आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या कोथरुडमधील वारकऱ्यांसाठी हक्काची निवारा उपलब्ध झाला आहे. मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र पंढरपूर मधील कुंभार गल्ली परिसरात वारकरी भवन उभारण्यात आले आहे. आषाढी आणि कार्तिक महिना आला की, विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेल्या कोथरूड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी, कर्वेनगर, सूस-म्हाळुंगे, पाषाण आदी भागांसह वारजे, वडगाव आदी भागातील हजारो वारकरी दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपुरच्या दिशेने पायी जातात. त्यांच्या निवाऱ्याची आणि गैरसोईची समस्या नेहमीच सतावत असे. त्यामुळे वारकरी बांधवांसाठी पश्चिम हवेली वारकरी सेवा संस्था भवन उभारण्याचा संकल्प केला होता.

तब्बल १५ फूट मोदक प्रतिकृतींसह गणेश चतुर्थी साजर – सविस्तर बातमी 

संकल्प पुर्णत्वास जाण्यास अनंत अडचणी येत होत्या. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना, संबंधित विषय त्यांच्या समोर आला असता, त्यांनी तात्काळ यासाठी पुढाकार यांनी अडचणी दूर केल्या. लोकसहभागातून निधी गोळा करुन अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त वारकरी भवन उभारले. भवनाचे ३० ऑगस्टला लोकार्पण झाले. वारकरी बांधवांची सेवा म्हणजेच विठूरायाची सेवा आणि पुण्यकार्याचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले. सेवाभावी कार्यात मला खारीचा वाटा उचलण्याची संधी लाभली याचा अपार आनंद होत आहे, अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील यांच्या कार्याप्रति कोथरुडमधील वारकरी बांधवांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, या भवनामुळे आषाढी आणि कार्तिकी वारीकाळात श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी सोय झाली आहे, अशी भवना, पश्चिम हवेली वारकरी सेवा संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी व्यक्त केली. लोकार्पण प्रसंगी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजप उपाध्यक्ष विठ्ठल आण्णा बराटे, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, अभिजीत राऊत, गिरीश भेलके, विवेक मेथा, प्रणव परिचारक, शंकरभाऊ मोकाटे, हरिभाऊ बराटे, संतोष बराटे, संग्राम दांगट, पंढरीनाथ दांगट, विठ्ठल चौधरी, रमेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×