Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

मोटारीच्या धडकेत बैलाचा मृ्त्यू, चालकाविरुद्ध गुन्हा

मोटारीच्या धडकेत बैलाचा मृ्त्यू, चालकाविरुद्ध गुन्हा

मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत बैलाचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार संजय मोरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाॅर्न वाजविल्याने मोटार चालकाला मारहाण -सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी मोटार बाॅम्बे इंजिनिअरिंग ग्रुपसमोरून लोहगाव विमानतळाकडे सोमवारी दुपारी निघाली होती. भरधाव मोटारीने रस्त्याने निघालेल्या बैलाला धडक दिली. मोटारीने धडक दिल्याने बैलाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या बैलाला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच बैलाचा मृत्यू झाला होता.

भरधाव मोटार चालवून बैलाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार माचरे तपास करत आहेत. दरम्यान, मोटारीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. प्राणीप्रेमींनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोटार चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×