Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

हाॅर्न वाजविल्याने मोटार चालकाला मारहाण

हाॅर्न वाजविल्याने मोटार चालकाला मारहाण

हडपसरजवळील घटना, आरोपी पसार

marathinews24.com

पुणे – मोटरीचा हाॅर्न वाजविल्याने झालेल्या वादातून एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रिक्षा चालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रमेशचंद्र रतीपाल वर्मा (वय ५४, रा. पाताळगंगा औद्योगिक वसाहत, रसायनी, जि. रायगड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बनावट कागदपत्रे वापरून मालकाची ४२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेशचंद्र वर्मा हे सोमवारी मध्यरात्री मोटारीतून पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. मांजरी बुद्रुक नजीक असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ त्यांनी एका रिक्षा चालकाला पाहून हाॅर्न वाजविला. या कारणावरून रिक्षा चालकासह साथीदारांनी वर्मा यांना अडवून शिवीगाळ केली. त्यांना काठीने, तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, मारहाण करून आरोपी पसार झाले. पोलीस हवालदार टेंगले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×