Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बनावट कागदपत्रे वापरून मालकाची ४२ लाखांची फसवणूक

बनावट कागदपत्रे वापरून मालकाची ४२ लाखांची फसवणूक

कंपनीचे बील स्वतः च्या बँकखात्यात वर्ग करून घेतले

marathinews24.com

पुणे – कंपनीच्या पर्यवेक्षकाने मालकाच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून तब्बल ४२ लाख ४६ हजार ८५१ रुपयांची संपूर्ण रक्कम स्वतः च्या बँक खात्यात जमा केली. ही घटना लोहगावमधील गॅरिसन अभियांत्रिकी कार्यालयात बांधकाम कामाशी संबंधित देयकातील बिलात घडली आहे. याप्रकरणी आरोपी प्रतीक प्रदीप बेरा याच्याविरूद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संदीपसिंग अमरसिंग यांनी फिर्याद दाखल केली आहे.

नऱ्हेत सोसायटीतील ७ दुचाकी पेटविल्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ‘संदीप एंटरप्रायजेस’ नावाची बांधकाम कंपनी चालवत आहे. २०२२ मध्ये त्यांच्या कंपनीला मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसकडून दोन कंत्राटे मिळाली. पहिला करार १ कोटी ४९ लाख ८२ हजार ९८५ रुपयांचा होता. ज्यामध्ये हवाई दलाच्या क्वार्टर्समध्ये गिझर आणि एक्झॉस्ट फॅन बसवण्याचे काम समाविष्ट होते. दुसरा करार ५५ लाख ८४ हजार ४२३ रुपयांचा होता, ज्यामध्ये दोन इमारतींच्या अंतर्गत नूतनीकरणाचे काम समाविष्ट होते. संदीप सिंग यांनी कराराचे काम हाताळण्यासाठी प्रतीक बेरा याला पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले होते. करार मिळाल्यानंतर कंपनीने ‘बँक ऑफ बडोदा’च्या विमाननगर शाखेत खाते उघडले होते. त्याच खात्याची माहिती आणि कागदपत्रे कंपनीच्या लेटरहेडवर एमईएस आणि गॅरिसन कार्यालयात सादर केली.

काम सुरळीतपणे पूर्ण झाले आणि १७ जुलै २०२३ रोजी कंपनीला काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी गॅरिसन अभियांत्रिकी कार्यालयात अंतिम बिल सादर केले. मात्र, त्याचवेळी संदीप सिंग यांच्या कुटुंबातील एकाचा मृत्यूमुळे ते पंजाबला गेले. कामाशी संबंधित कागदपत्रे त्यांनी प्रतीक बेराकडे दिली होती. आरोपी बेराने कंपनी मालकाच्या अनुपस्थितीचा फायदा घेत संदीप एंटरप्रायझेसच्या बनावट लेटरहेड आणि बनावट स्वाक्षर्‍यांसह एक नवीन आदेश फॉर्म तयार केला. ‘एचडीएफसी बँकेत’ खाते उघडून तो फॉर्म गॅरिसन कार्यालयात सादर केला. कार्यालयाने पडताळणीशिवाय संपूर्ण पेमेंट त्याच बनावट खात्यात पाठवले.

हे पेमेंट दोन भागात करण्यात आले. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी अनुक्रमे ३१ लाख ९५ हजार १२० रुपये, ५ लाख ८९ हजार १७९ रुपये आणि १ लाख ७९ हजार ७८६ रुपये जमा केले. त्यानंतर ११ डिसेंबर २०२३ रोजी १ लाख ४४ हजार २४१ रुपये आणि १ लाख ३८ हजार ५२५ रुपये पाठवण्यात आले. अशाप्रकारे, आरोपी बेराने ४२ लाख ४६ हजार ८५१ रुपये स्वतःच्या बँकखात्यात मिळविले.

तक्रारदार संदीप सिंग यांना कर सल्लागाराकडून कंपनीला पैसे देण्यात आल्याचे कळाले. तेव्हा त्याने प्रतीक बेराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन बंद होता. ११ जानेवारी २०२४ रोजी प्रतीकने त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर फोन करून सांगितले की पेमेंट आले आहे, तो त्याला प्रत्यक्ष भेटून बोलेल. पण तो पुन्हा सापडला नाही. १२ जानेवारी रोजी, जेव्हा ही बाब कंपनीचे कायदेशीर अधिकारी टायटस जोसेफ यांना सांगण्यात आली, तेव्हा प्रतीक स्वतः त्याच्या कार्यालयात आला आणि त्याने चूक केली आहे, पैसे परत करतो अशी बतावणी केली. १३ जानेवारी २०२४ रोजी, त्याने संदीप एंटरप्रायझेसच्या बँक खात्यात फक्त ४ लाख २० हजार रुपये पाठवले.

त्याने उर्वरित रक्कम हडप केली होती. संदीप सिंग यांनी ९ जून २०२५ रोजी विमानतळ पोलिस ठाण्यात प्रतीक बेराविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक आशालता गणेश खापरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×