घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीस

घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीस

१४ लाखांचा ऐवज जप्त, विमानतळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – ऐन दिवाळीत घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना विमानतळ पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. टोळीकडून ८ गुन्हे उघडकीस आणून १४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शिवम दत्ता अवचर ( वय १९, रा. कामटे कॉलनी, न-हे) आणि नवनाथ उर्फ लखन बाळु मोहिते (वय २२, रा. वैदुवाडी, हडपसर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.

ऑनलाईनरित्या हॉटेल बुकींग पडले सव्वा दोन लाखांना – सविस्तर बातमी 

चोरट्यांनी दिवाळीच्या सणात घरफोडी करून साडे दहा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २९ ऑक्टोबरला घडली होती. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानुसार तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी एकजण अल्पवयीन आहे. सराईत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

चोरट्यांनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध भागांतील बंद घरे आणि दुकाने फोडून आणखी ७ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. संबंधित गुन्ह्यांमधून चोरी केलेले २ लाख ६ हजार रुपयांचे दागिने व रोखही पोलिसांनी जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, नितीन राठोड, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, अंबादास चव्हाण राहुल जोशी यांनी केली.

ऐन दिवाळीत चोरट्यांनी ठिकठिकाणी घरफोडी केल्याचे तपासत उघडकीस आले आहे. त्यांनी केलेले ८ गुन्हे उघडकीस आणून १४ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. विमानतळ पोलिसांच्या तपास पथकाने अतिशय चांगल्या पद्धतीने गुन्ह्यांची उकल केली आहे.

सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×