घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा तरुणावर हल्ला

नातीकडूनच जबरी चोरीचा प्रयत्न; कर्वेनगरमधील घटना

कोथरूडमधील घटना

marathinews24.com

पुणे – चोरीसाठी सोसायटीत रविवारी पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी सदनिकेत शिरून तरुणावर हल्ला केला. चोरट्यांनी तरुणाच्या डोक्यात गज मारल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेत आदित्य हेमंत ढवळे (वय ४२, रा. राहुलनगर सोसायटी, कोथरूड ) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोथरूड भागातील राहुलनगरमध्ये घडली आहे. ढवळे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव परिसरात ५३ किलो गांजा जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील महर्षी कर्वे पुतळ्यासमोर राहुलनगर सोसायटी आहे. रविवारी (२८ सप्टेबर) पहाटे पावणेचारच्या सुमारास चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. पी-१ या इमारतीतील सदनिकेत ढवळे राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचा दरवाजा ठोठावला. दरवाजा बंद होता. त्यामुळे सदनिकेत कोणी नसल्याचे चोरट्यांना वाटले. दरवाजा ठोठावल्यानंतर ढवळे यांनी दरवाजा उघडला. चाेरटे आतमध्ये शिरले आणि त्यांनी ढवळे यांना धमकावले. ढवळे यांनी चोरट्यांना विरोध केला. चोरट्यांशी त्यांची झटापट झाली. चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी गज घातला. ढवळे गंभीर जखमी झाले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून ७० हजारांचे दागिने लुटले. आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याच धमकी देऊन चोरटे पसार झाले. जखमी अवस्थेतील ढवळे यांनी या घटनेची माहिती पाेलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक आायुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×