Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

एरंडवणे, वाघोलीत घरफोडी; ११ लाखांचा ऐवज चोरीला

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील एरंडवणे, वाघोली भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ११ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. एरंडवणे भागातील उदय हाऊसिंग सोसायटीत भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सतत अपमानित केल्याने हडपसरमध्ये तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कुटुंबीय हे ६ जुलै रोजी सदनिका बंद करुन दुपारी पावणेदोनच्या सुमारास बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून एक लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. दुपारी साडेतीनच्या सुमारास घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

वाघोली परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी नऊ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत व्यावसायिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोहगाव-वाघोली रस्त्यावर राहायला आहेत. चोरट्यांनी ६ जुलै रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून चोरट्यांनी दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक देवगडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×