Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीपात्रातील रस्ते बंद

खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील मार्ग पाण्याखाली, वाहतूक बंद

marathinews24.com

पुणे – खडकवासला धरण साखळीत बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. धरणातून २७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली गेले. नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी कठडे टाकण्यात आले आहेत. खडकवासला धरण साखळीत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्याटप्याने पाणी सोडण्यात आले.

स्वारगेट मेट्रो स्टेशनला लागली गळती – सविस्तर बातमी

बुधवारी सकाळी धरणातून २७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर ते डेक्कन जिमखाना, डेक्कन जिमखाना ते एरंडवणे भागातील रजपूत वीटभट्टी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले. या रस्त्यांचा वापर कोथरूड, एरंडवणेकडे जाण्यासाठी वापर करतात. मुठा नदी दुथडी भरून वाहत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून नदीपात्रातील रस्त्यांवर कठडे टाकून वाहतुकीस बंद करण्यात आले. तेथे पोलीस, तसेच अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले. नदीकाठाला लागून असलेल्या वसाहतीतील रहिवाशांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रात लावलेली दुचाकी, चारचाकी वाहने बुडाली. पाणी ओसरेपर्यंत नदीपात्रातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जंगली महाराज रस्त्यावर झाड कोसळले

जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकाजवळ मध्यरात्री मोठे झाडे काेसळले. शिवाजीनगर भागातील एका सोसायटीसमोर झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. झाशीची राणी चौकाजवळ झाड कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवाानांनी घटनस्थळी धाव घेतली. झाडाच्या फांद्या कापण्यात आल्या. झाडाच्या फांद्या बाजूला काढून रस्ता वाहतुकीस खुला करुन देण्यात आला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×