Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

केज तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन ठिकाणी घरफोडी

बीडच्या अंबाजोगाईतील राडीत धाडसी चोरी

पोलिसांनी रात्रगस्त घालण्याची नागरिकांकडून मागणी

marathinews24.com

बीड – केज तालुक्यात एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असुन पोलिसांकडून चोरट्यांचा तपास करण्यासाठी श्वान पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

केजमध्ये बनावट दारुसह ७ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी

लव्हरी येथील ज्ञानेश्वर चाळक हे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्या घरी रात्री आई वडील, पत्नी व दोन मुले घरी होते. ते सर्वजण एका खोलीत झोपलेले असताना दि. २२ जानेवारीला मध्यरात्री चोरट्यांनी बाहेरून दरवाजाला कडी लावून त्यांच्या घराच्या दुसऱ्या खोलीचे कुलूप तोडून त्यातील कपाट उघडले. त्यातील दीड लाख रुपये आणि प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या ५० हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

कानडीमाळी गावातील आत्माराम लिंबाजी राऊत यांचे वेल्डिंगचे दुकान फोडून वेल्डिंग मशीन, ग्राईंडर आणि इतर साहित्य असे सुमारे १९ हजारांचे साहित्य लंपास केले. दोन्ही चोरीच्या घटनेत रोकड, दागिने, साहित्य असा मिळून सव्वादोन लाख रुपये. किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. माहिती पोलिसांना मिळताच चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×