Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

केजमध्ये बनावट दारुसह ७ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

टँकरमधून मद्यार्क चोरी प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

दोन जण ताब्यात; युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या
हद्दीत कारवाई

marathinews24.com

बीड – राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ७ लाख ३६ हजार रुपयाची बनावट दारू जप्त केली आहे. केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. वाहनातून बनावट दारू वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.

पुण्यात ई-सिगारेटसह हुक्‍का फ्लेवर जप्‍त – सविस्तर बातमी

२१ जानेवारीला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चौरे यांच्या पथकातील कुबडे, कोरे, कदम, जारवाल, एस.व्ही. लोमटे, वायबट, कदम, श्रीमती ढवळे, पोतलवाड, चाटे यांनी कारवाई केली.

बनावट दारू वाहतूक करीत असताना रेवण सोपान नखाते वय (३५ वर्ष), (रा. मठगल्ली, धारूर), गणेश मारोती धुमाळ वय (३५ वर्ष), (रा. उपळाई रोड, बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर) आणि पप्पू कदम हे स्विफ्ट गाडी क्र. (एम एच १४/ इ पी ३७४१) मधून बनावट दारूची वाहतूक करीत असताना आढळून आले. कळंब-अंबाजोगाई रोडवरील युसुफवडगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली. केज परिसरात बनावट दारूची वाहतूक करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड व अंबाजोगाई याच्या पथकाने मोठ्या प्रमाणात बनावट दारू व इतर मुद्देमाल जप्त करत त्यामध्ये १ लाख ३२ हजार रुपयांची रॉयल स्टॅग, ८४ हजाराची टँगो पंच, १ लाख ४० हजाराचे तीन मोबाईल, गाडीची किंमत ३ लाख ८० हजार असा एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत रेवण सोपान नखाते, गणेश मारोती धुमाळ या दोघांना राज्य उत्पादन शुल्क पथकाने ताब्यात. घेतले आणि पप्पू कदम हा पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×