Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यातील कोथरूड, भवानी पेठ, शिवणे, हडपसरमध्ये घरफोडी

येवलेवाडी अन मुंढव्यात ४६ लाखांची घरफोडी

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. कोथरूड, भवानी पेठ, शिवणे, हडपसरमधील महंमदवाडी भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड असा ११ लाख रुपयांचा ऐवज लांबविला.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणाला लुटले – सविस्तर बातमी

भवानी पेठेतील गुरुनानकनगर भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हे गुरुनानकनगर भागात राहायला आहेत. तक्रादार आणि कुटुंबीय सोमवारी (२ फेब्रुवारी) सदनिका बंद करुन सकाळी अकराच्या सुमारास कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून चार लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदार घरी परतले. त्यावेळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक कुदळे तपास करत आहेत.

कोथरूड गावठाणातील तेजसगनगर परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील एक लाख ६७ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत. तसेच वारजे-एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४८ हजार ८०८ रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे तपास करत आहेत.

हडपसरमधील महंमदवाडी भागात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ८३ हजार रुपयांचे दागिने लांबविले. याबाबत एका तरुणाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×