Breking News
पुण्यातील भवानी पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खूनफुरसुंगीत तरुणांच्या खुनाचा प्रयत्न; दोघे जखमीपुण्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’राज्य शासनातर्फे तीन दिवसीय वारकरी साहित्य संमेलन घेणारसामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्नपुण्यात रेस्क्यू’ फाउंडेशन मधून १२ बांगलादेशी महिला पळाल्‍यापुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची फसवणूकधनकवडीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’कारवाईबीड जिल्ह्यात १४ एप्रिलला डीजेच्या मोठ्या आवाजावर बंदीसासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मार्केटयार्डात घरफोडी; ८ लाखांचा ऐवज चोरला

बीडच्या अंबाजोगाईतील राडीत धाडसी चोरी

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, मार्केटयार्ड परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडत सव्वा आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात ५६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे नंदनवन येथील सुर्यमुखी गणेश मंदिर गणेश सहकारी सोसायटीत राहण्यास आहेत. ते मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या घराला कुलूप लावून कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ८ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. तक्रारदार बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घरी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पसार झालेल्या चोरटयांचा शोध सुरू केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×