११ लाखांचा ऐवज चोरीला; विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती विश्रामबाग परिसरातील लोकमान्य नगरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली आहे. कपाटातील ६५ हजारांची रोकड, १० लाख ३३ हजारांचे दागिने मिळून ११ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पायस सोसायटीतील घरक्रमांक ५०१ मध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आई विश्रामबाग परिसरातील लोकमान्य नगरात राहायला आहे. २० मे रोजी त्यांची आई कामानिमित्त दुसर्या ठिकाणी गेली होती. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ६५ हजारांची रोकड, १० लाख ३३ हजारांचे दागिने मिळून ११ लाखांचा ऐवज चोरून नेला. दुसर्या दिवशी महिला घरी गेली असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करीत आहेत.