बसची महिलेला धडक; पादचारी ज्येष्ठ महिला ठार

बसची महिलेला धडक; पादचारी ज्येष्ठ महिला ठार

विमानतळ परिसरातील गंगापूरम चौकात घडला अपघात

marathinews24.com

पुणे – रस्ता ओलांडत असलेल्या ज्येष्ठ महिलेला खासगी बसने जोराची धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. २९) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. अपघातात भावना सुनील रावल (६६, रा. प्राइड रेसिडेन्सी, विमाननगर, पुणे) यांचा मृत्यू झाला. विमानतळ परिसरातील गंगापूरम चौकात अपघात घडला.

पुण्यातील गुन्हेगारीवर अंकुश, झिरो टॉलरन्सला प्राधान्य देणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बस चालक (एमएच १४ एलएस २१७१) भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी रस्ता ओलांडत असलेल्या जेष्ठ महिला भावना रावल यांना त्याने जोराची धडक दिली. अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बस चालक अनिल जाधव (२२, मूळ रा. मुखेड, ता. जिंतूर, जि. परभणी, सध्या रा. भोसरी) याला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×