Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

पुण्यात व्यावसायिकाला धमकावून रोकड लुटली

अल्पवयीनाकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

ऐन दिवाळीत लूटमारीच्या घटनेमुळे घबराट

marathinews24.com

पुणे – शहरातील बाजीराव रस्ता परिसरात व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील १ लाख ३० हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ६० वर्षीय व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचे सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्ता परिसरात इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. एक ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची विक्री केली जाते. दिवाळीमुळे गुरुवारी रात्री उशीरापर्यंत दुकान सुरू होते. व्यावसायिक शुक्रवार पेठेत राहायला आहेत. रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करुन व्यावासायिक दुचाकीवरुन घरी निघाले होते. व्यवसायातून जमा झालेली एक लाख ३० हजारांची रोकड त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती.

बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवनजवळील गल्लीतून ते रात्री घरी निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. व्यावसायिकाला धक्काबुक्की केली. व्यावसायिकाने घाबरून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली १ लाख ३० हजारांची रोकड चोरट्यांना दिली. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती घाबरलेल्या व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बाजीराव रस्ता,सुभाषनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

लूटमारीची दुसरी घटना

दुचाकीस्वार व्यापाऱ्याला धमकावून त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्यावर नुकतीच घडली. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास ते बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्याने निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांना धमकावून खिशातील ४५ हजारांची रोकड लुटली. व्यापाऱ्याने आरडाओरडा केला. दिवाळीत व्यापाऱ्यांना लूटण्यात आल्याची दुसरी घटना घडल्याने घबराट उडाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×