बिबवेवाडी पोलीसांनी सराईताला केली अटक
marathinews24.com
पुणे – मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या सराईत आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल ५ पोलीस ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यात तो वॉटेंड असल्याचे उघडकीस आले आहे. शिवा ऊर्फ शिवम गणेश माने असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सिंहगड, शिरवळ, बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने त्याला ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी शिवा माने याने साथीदारांच्या मदतीने १४ डिसेंबर २०२४ मध्ये संशयावाून दोघांना बेदम मारहाण केली होती.
पुण्यात भाजप कडून पाकिस्तानचा झेंडा जाळून भ्याड हल्ल्याचा निषेध – सविस्तर बातमी
तरूणाच्या डोक्यात, पायासह हातावर जबर मारहाण केली होती. याप्रकरणी शिवा ऊर्फ शिवम गणेश माने, सद्दाम चमनुर शेख, सिंग यांच्यासह दोन व तीन साथीदाराविरुध्द गुन्हा दाखल होता. तेव्हापासून फरार असताना आपली ओळख लपवून तो गुन्हे करत होता. पाहीजे आरोपीचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उपानिरीक्षक अशोक येवले हे पथकासह आरोपीचा शोध घेत होते. आरोपी माने हा मध्यरात्रीच्या सुमारास मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची गोपनियम माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, सुमीत ताकपेरे, गायकवाड, पाटील, काळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला शिवतेजनगरकडे जाताना ताब्यात घेत अटक केले.
मैत्रिणीला भेटण्याठी आला…
सराईत शिवा माने विविध गुन्ह्यात पसार झाला होता. पसार कालावधीत पोलिसांपासून सावध कसे राहायचे, अटक टाळण्यासाठी कोणती युक्ती करायची, कोणालाही भेटायचे नाही, या सुत्रांचे तो तंतोतंत्र पालन करीत होता.५ पोलीस ठाण्यातंर्गत गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे आरोपी होता. बिबवेवाडी पोलिसांकडून त्याच्यावर वॉच ठेवण्यात आला होता. मैत्रिणीला भेटाण्यासाठी आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केले.