पुण्यात वेधशाळा चौकात मोटारीला आग

पुण्यात वेधशाळा चौकात मोटारीला आग

मोटार चालक बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली

marathinews24.com

पुणे – वेधशाळा चौकात मोटारीला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मोटार चालक बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली. वेधशाळा चौकातून मोटार चालक नितीन झगडे (रा. बारामती) हे वेधशाळा चौकातून शनिवारी रात्री निघाले होते. त्यावेळी मोटारीच्या दर्शनी भागातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. एका वाहन चालकाने झगडे यांना सांगितले. झगडे यांनी मोटार रस्त्याच्या कडेला थांबविली.

तरुणाचा खुनाचा प्रयत्न- फरार गुंड अटकेत – सविस्तर बातमी 

सुरुवातीला नागरिकांनी आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भडकली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या कसबा पेठ केंद्रातील अधिकारी कमलेश चौधरी, संजय गायकवाड, उबेद शेख, सुमित दळवी, प्रसाद नाणेकर, आतिश नाईकनवरे, मयूर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवले. मोटारीत आग नेमकी कशी लागली, याची माहिती मिळू शकली नाही. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×