Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

सराईत वाहन चोरट्याला बेड्या; ८ गुन्हे उघड

हडपसर पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहराच्या विविध भागातून वाहन चोरी होत असताना हडपसर पोलिसांनी सराईत वाहन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. हडपसरमधील ६ तसेच काळेपडळ व मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक असे गुन्हे उघडकीस आले आहेत. सुहान मुनब्वर खान (वय २२, रा. रामटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पुण्यात पीएमपीएल प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी

वाहन चोरीच्या घटना सातत्याने सुरू आहेत. सार्वजनिक रस्ते, पार्किंग अशा भागातून दुचाकी वाहने चोरी जात आहेत. यादरम्यान पोलिस अंमलदार भाऊसाहेब खटके यांना माहिती मिळाली की, सुहान खान याने विविध भागातून वाहने चोरी केली आहेत. त्यानूसार पथकाने सुहान खान याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्याच्याकडून ८ गुन्हे उघडकीस आले. अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी यांच्यासह पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×