Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

वर्गणीवरुन मारहाण केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा

Sahakarnagar gang terror

येवलेवाडी पोलिसांनी केले गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू असताना गृहप्रकल्पावरील कर्मचाऱ्याला वर्गणीसाठी मारहाण केल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत आकाश गजानन चौधरी (वय २७, रा. चैतन्यनगर, धनकवडी) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विनोद चंदर चव्हाण, विजय शिवाजी दूनघव, नवीन सिद्राम मोटे, आयेश विजय कमले, राहुल नागप्पा उन्नत, समर्थ बाबुराव पांडागळे (सर्व रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना फटका; केबल कारवाईनंतर इंटरनेट सेवा विस्कळीत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील टिळेकरनगर भागात एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. नियोजित गृहप्रकल्पात चौधरी पर्यवेक्षक म्हणून काम पाहतात. शुक्रवारी (३ मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास चौधरी गृहप्रकल्पावर होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. आरोपींनी उत्सवासाठी ५० हजार रुपयांची वर्गणी मागितली. तेव्हा माझ्याकडे एवढे पैसे नाही, असे चौधरीने आरोपींना सांगितले. आरोपींनी त्यांना धमकावून बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घेऊन चल, असे सांगितले. चौधरी यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक नेवसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×