Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

श्वानाच्या मृत्यू प्रकरणी ‘पेटशाॅपच्या चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

कल्याणीनगर भागातील घटना

marathinews24.com

पुणे – श्वानाच्या मृत्यू प्रकरणी कल्याणीनगर भागातील एका पेटशाॅपच्या मालकासह तिघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याप्रकरणी वेटीक पेटशाॅपचे मालक, कर्मचारी इस्माइल शेख, राज उर्फ प्रदीप दास यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भाजपकडून ‘पालावरील दिवाळी’ उपक्रम – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी वडगाव शेरी भागातील एका उच्चभ्रु सोसायटीत राहायला आहे. तिने डॅश नावाचा श्वान पाळला होता. कल्याणीनगर भागात वेटीक पेट शाॅप आहे. पेट शाॅपमध्ये श्वानांची देखभाल, निगराणी राखली जाते. तरुणीने २८ सप्टेंबर रोजी तिचे श्वान पेटशाॅपमध्ये पाठविले होते. तरुणीच्या श्वानाला आंघोळ घातल्यानंतर त्याला उलटी झाली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

श्वानाल आंघोळ योग्य पद्धतीने घातली नाही. पेटशाॅपमधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्राणी क्रुरता प्रतिबंधक अधिनियम कलम ११, तसेच अन्य कलमांन्वये पेटशाॅपच्या मालकासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×