भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

काँग्रेस भवन आंदोलन प्रकरण

marathinews24.com

पुणे – काँग्रेस भवन परिसरात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलन केले. झटापट, तसेच दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणी भारतीय जनात पक्ष, काँग्रेस कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी फिर्यादी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्या. परस्परविरोधी फिर्यादीनंतर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन; २३ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवनसमोर आंदोलन केले. सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध केला. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दोन्ही बाजूच्य कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या घटनेत काँग्रेसचे तीन, तसेच भाजपचे दोन असे पाच कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. दोन पोलीस कर्मचारी, दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले.

त्यानंतर रात्री उशीरा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, युवा मोर्चाचे पदाधिकारी दुष्यंत मोहोळ यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्या प्राची नितीन दुधाणे (वय ४२, रा. दुधाणेनगर, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे करत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पुनीत श्रीकांत जोशी (वय ३५, रा. आयडियल काॅलनी, कोथरूड) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे, गौरव बाळंदे, अक्षय जैन, सागर धाडवे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×