महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ व्या वर्धापनदिन समारंभाचे आयोजन
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार १ मे २०२५ रोजी सकाळी ८ वा. पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर येथे होणार असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे.
राष्ट्रध्वजास मानवंदना, पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींचे संयुक्त संचलन होणार असून श्री. पवार या प्रसंगी मानवंदना स्वीकारणार आहेत. शासकीय ध्वजारोहण समारंभास केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख, प्रादेशिक प्रमुख, कार्यालयीन प्रमुख, पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळी ७.४५ वा. वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.