Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

काेंढवा भागातील वाहतुकीत बदल; कौसरबागेत जड वाहनांना बंदी

रमजाननिमित्त कोंढवा भागात वाहतुकीत बदल

marathinews24.com

पुणे – रमजाननिमित्त कोंढवा भागातील वाहतूक व्यवस्थेत सायंकाळी पाच ते रात्री बारा वाजपर्यंत बदल करण्यात आले आहेत. शीतल पेट्रोल पंप, अशोका म्युज सोसायटी, पारगेनगर, कौसरबाग भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी-महेश भागवत – सविस्तर बातमी

रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांकडून उपवास (रोजे) केले जातात. सायंकाळी उपवास (रोजा इफ्तार) सोडले जातात. त्यानिमित्त विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, फळे खरेदीसाठी कोंढवा भागातील मोठी गर्दी होती. यापार्श्वभूमीवर रमजान महिन्यांची सांगता होईपर्यंत वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांना स्वयंसेवक सहकार्य करणार आहेत. वाहतूक पोलिसांसह स्वयंसेवकाांना सहकार्य करावे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त जाधव यांनी केले आहे.

ज्योती हाॅटेल चौकातून मेफेअर सोसायटी चौकातून पारगेनगर रस्ता, तसेच पारगेनगर ते ज्योती हाॅटेल चौक दरम्यान सर्व प्रकारची जड वाहने, तसेच टँकरला बंदी घालण्यात आली आहे. वाहन चालकांनी ज्योती हाॅटेल चौक, शीतल पेट्रोल पंप चौक, पारगेनगर या मार्गाचा वापर करावा. सर्वोदय चौकातून कौसरबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मेफेअर सोसायटी चौक, ज्योती हाॅटेल चैाक असा पर्यायी मार्ग जड वाहनांनासाठी निश्चित करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×