ई व्ही चार्जिंग स्टेशनच्या नावाखाली १२ लाखांचा गंडा
Marathinews24.come
पुणे- ई व्ही (इलेक्ट्रॉनिक व्हेइकल) चार्जिंग स्टेशन सुरू करून नफा मिळवून देण्याच्या नावाखाली एकाने ४८ वर्षीय नागरिकाची १२ लाकांची फसवणूक केली.
याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बाळासाहेब गायकवाड (रा. वरद विनायक सोसायटी, नऱ्हे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीत राहणाऱ्या तक्रारदार यांची फेब्रुवारी २०२३ मध्ये राहुल गायकवाड सोबत भेट झाली होती. त्याने ई व्ही इलेक्ट्रीक
चार्जिंग स्टेशन सुरू करून त्यापासून नफा मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांनी आरोपीला १२ लाख रुपये दिले. आरोपीने चार्जिंग स्टेशन सुरू न करता तसेच दिलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. याप्रकरणाचा पुढील तपास – पोलिस उपनिरीक्षक कल्पना काळे या करत आहेत.