Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नवा ऐतिहासिक विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नवा ऐतिहासिक विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर

शरद पवारांना मागे टाकत वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर

marathinews24.com

पुणे : (रेवण कोळेकर) – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याच्या यादीत त्यांनी आता तिसरे स्थान पटकावले असून, त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांनाही मागे टाकले आहे. 12 जुलै 2026 पर्यंत फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ 2,430 दिवसांचा, म्हणजेच सुमारे सहा वर्षे सात महिने इतका झाला आहे.

आषाढीवारीत ‘संवादवारी’; लोककल्याणकारी योजनांच्या जागरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी 

मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाच्या यादीत दिवंगत वसंतराव नाईक हे प्रथम क्रमांकावर असून, त्यांच्या पाठोपाठ दिवंगत विलासराव देशमुख दुसऱ्या स्थानावर आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी तिसरे स्थान मिळवत आपल्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे.

विशेष म्हणजे, 2014 ते 2019 या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांनी सलग पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केला. महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मोजक्याच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत त्यांनी एकूण कार्यकाळात ही नवी कामगिरी केली आहे.

५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचे २,४३० दिवस पूर्ण करत शरद पवारांना मागे टाकले, राज्याच्या इतिहासात सलग ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे केवळ दुसरेच मुख्यमंत्री आहे. तसेच, सर्वात कमी कालावधीसाठी २०१९ मधील ८० तासांचे सरकार मुख्यमंत्री राहण्याचा एक वेगळा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.

शरद पवार यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले असले, तरी त्यांना एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ अजूनही खूप मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या नावावर आणखी नवे विक्रम नोंदवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×