Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

खडकवासल्यात ‘हिट अँड रन’ मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील चार वर्षांचा बालकाचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – मद्यपी मोटार चालकाने वाहनांना धडक दिल्याची घटना खडकवासला भागात शनिवारी सायंकाळी घडली. भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील चार वर्षांचा बालकाचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाले. नागरिकांनी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मद्यपी मोटार चालकाला पकडले. त्याला चोप देऊन पोलिसंच्या ताब्यात दिले. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसंनी मोटारचालकाला अटक केली.

मुंढव्यातील झेड काॅर्नर भागात तरुणाचा खून – सविस्तर बातमी

यशराज निलेश कांबळे (वय ४, रा. धायरी) असे मृत्यमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहेत. अपघातात दुचाकीस्वार निलेश कांबळे (वय ३६) आणि त्यांची पत्नी जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसंनी मद्यपी मोटारचालक अमोल गोरक्षनाथ गेगडे (वय ३६, रा. अहिल्यानगर) याला अटक केली.

पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश कांबळे हे भाजीपाला विक्रेते आहेत. खडकवासला भागात ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी (१६ मे) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकीस्वार कांबळे, त्यांचा मुलगा यशराज आणि पत्नी हे दुचाकीवरुन खडकवासल्याहून पुण्याकडे निघाले होते. खडकवासला भाजी मंडई परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार कांबळे यांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी, तसेच चारचाकी वाहनाला मोटारीने धडक दिली. मोटार न थांबवता मोटार चालक अमोल हा पसार होण्याच्या तयारीत होता.

अपघातानंतर खडकवासला भाजी मंडई परिसरात नागरिकांची गर्दी झाली. नागरिकांनी पाठलाग करुन मोटार चालक अमोलला पकडले. नागरिकांनी त्याला चोप दिला. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. गंभीर जखमी झालेल्या यशराजसह त्याच्या आई-वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारांदरम्यान यशराजचा मृ्त्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक कसबे तपास करत आहेत. आरोपी मोटारचालक अमोल याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसंनी त्याला अटक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×