लबाना समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे स्वागत
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र शासनाच्यावतीने नवी मुंबई, खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून लाभत लबाना समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे लबाना समाजाचे अध्यक्ष संतोकसिंग लबाना यांनी केले.
ताल-सुरांच्या अनोख्या मिलाफाची मंत्रमुग्ध करणारी सांज – सविस्तर बातमी
लबाना म्हणाले, श्री गुरु तेग बहादूर साहिबजीच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नागपूर, नांदेड आणि नवी मुंबई, खारघर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे समाजाच्यावतीने आभार मानतो. साहिबजी आणि मख्खन सिंग लबाना यांचे ऐतिहासिक संदर्भ विचारात घेता आजही लभाना समाजात मख्खन सिंग लबाना यांना श्रद्धेने स्मरले जाते. ते सत्य आणि निष्ठेचे प्रतीक मानले जातात.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भाविकांची सेवा करण्यासाठी समाजातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लबाना यांनी केले.






















