दाम्पत्याविरुद्ध हडपसर पोलिसांकडून गुन्हा
marathinews24.com
पुणे – बाजार भावापेक्षा कमी दरात कपडे विक्रीच्या आमिषाने हडपसर भागातील एका कपडे विक्रेत्याची ३ कोटी ४६ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रोहित हरीश नागदेव, त्याची पत्नी टीना उर्फ मीनाक्षी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कपडे विक्रेत्याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गाडीचा कट लागल्याचा वाद गोळीबारावर पोहचला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे हडपसर भागात कपडे विक्री दुकान आहे. पुणे जिल्ह्यात त्यांच्या १० शाखा आहेत. २०२३ मध्ये रोहित नागदेवने कपडे विक्रेत्याची भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहरात घाऊक स्वरुपात कपडे विक्रीचा व्यवसाय असल्याचे नागदेवने त्यांना सांगितले. नागदेवने त्यांना कपड्यांचे नमुने दाखविले. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्याने पुन्हा कपडे विक्रेत्याची भेट घेतली. बाजार भावापेक्षा कमी किंमतीत कपडे विक्रीचे आमिष त्याने दाखविले.
त्यानंतर व्यावसायिकांनी नागदेव आणि त्याची पत्नी टीना यांच्या खात्यात एकूण मिळून ३ कोटी ४६ लाख ५९ हजार ९२० रुपये जमा केले. पैसे जमा केल्याानंतर नागदेव विविध प्रकारचे कपडे त्यांना देणार होता. १० मे रोजी त्यांनी नागदेवच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर व्यावसायिकाने चौकशी केली. तेव्हा नागदेवचा पिंपरी परिसरात घाऊक स्वरुपात कपडे विक्रीचा व्यवसाय नसल्याचे समजले.नागदेव पिंपरीत वास्तव्यास नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करत आहेत.