मटका चालकास जिल्हाधिकारी आणि एसपींचा दणका

केजच्या मटका चालकाची एमपीडीए कायद्याअंतर्गत कारागृहात रवानगी

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मटका चालकावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याला हर्मूलच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. जिल्ह्याचे जिल्ह्यधिकारी विवेक जॉन्सन यांची खंबीर साथ लाभली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे तसेच वाळु माफीयांचे व अवैध मटका जुगार चालकाचे समूळ उच्चाटन करण्याचा मानस ठेवला आहे.

फलक लावल्याने भाजप नगरसेविकेच्या भावाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी

एमपीडीए कायद्याअंतर्गत अनेक गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पोलीस अधिक्षकांच्या सुचनेवरून गणेश सुधीर खराडे (वय ३५ वर्षे रा. टेलरगल्ली, केज) याच्यावर एमपीडीए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकाऱ्यांना सादर केला होता. संबंधित स्थानबध्द इसमाविरुध्द पोलीस ठाणे केज येथे कल्याण व मिलन मटका खेळणे व खेळवीणे सेच रुपयाचे ९० रुपये देण्याचे आमिष दाखवुन बेकायदेशीररित्या मटका जुगार चालविणे व साक्षीदारांना धमक्या देणे शिवीगाळ करणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. संबंधित व्यक्तीने वर्तन सुधारावे याकरीता त्याचेवर कलम १२९ बीएनएसएस अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरीसुध्दा त्याने त्याचे वर्तनात सुधारना केली नाही. त्याच्यावर पोलीस ठाणे केज याठिकाणी १० गुन्हे दाखल असुन त्यापैकी ०६ न्यायप्रविष्ठ व ०४ गुन्हे तपासावर आहेत. प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दि. २२ जानेवारीला प्रकरणाच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून इसमास तात्काळ ताब्यात घेवून हुर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना संबधित प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना दिल्या होत्या.

आदेशावरुन शिवाजी बंटेवाड,उपनिरीक्षक महेश विघ्ने यांनी ताबे पोलीस अमलदार यांचे मार्फत गोपणीय माहीतीच्या आधारे इसमांना दि. २२ जानेवारी २०२६ रोजी केज शहरातून ताब्यात घेऊन केज ठाण्यात हजर केले.त्याला कारागृहात हजर करून स्थानबध्द केले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, सहायक पोलिस अधीक्षक केज व्यंकट राम खझड , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, एपीआय मांजरमे, गित्ते, उपनिरीक्षक महेश विघ्ने, शेलार, पठाण, जोगदंड, घोडके, अभिमन्यु औताडे, विबीषण चव्हाण यांनी केली आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाज कंटकांवर व दादागिरी करणाऱ्या, खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर, बेकायदेशीर जुगार व लॉटरी चालवणारे व्यक्तीवर जास्तीत जास्त मोक्का, एमपीडीए कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×