Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

फलक लावल्याने भाजप नगरसेविकेच्या भावाला बेदम मारहाण

रविवार पेठेत महिलेच्या पिशवीतून दागिने चोरी

कासेवाडीतील घटना; १५ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मृणाल कांबळे यांचा फलक लावण्यावरुन झालेल्या वादातून टोळक्याने कांबळे याच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी १४ ते १५ जणांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याप्रकरणी युवराज अडसूळ, अक्षय अडसूळ, सतीश साठे, विक्रम खेनट (सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ), प्रवीण फैजी, राहुल मोहिते (दोघे रा. लोहियानगर, महात्मा फुले पेठ) यांच्यासह १४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शंतून पांडूरंग उर्फ बापू कांबळे (वय ३०, रा. एसआरए वसाहत, लोहियानगर, महात्मा फुले पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कौटुंबिक वादातून पत्नीचा वार करुन खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीत कासेवाडी भवानी पेठ प्रभागातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मृणाल कांबळे निवडून आल्या. विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी गुरुवारी (२२ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास कासेवाडी भागात कांबळे यांचे कार्यकर्ते फलक लावत होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक अर्चना पाटील यांचे पती तुषार पाटील यांचे कार्यकर्ते तेथे आले. या भागात फलक लावू नका, असे शंतनू कांबळे यांना सांगण्यात आले. टोळक्याने शंतून कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. कासेवाडीत फलक लावल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असे शंतनू कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×