Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

“चला… चला काश्मीर!” – पुणेकरांना काश्मीर आयकॉनचे भावनिक आवाहन

“चला… चला काश्मीर!” – पुणेकरांना काश्मीर आयकॉनचे भावनिक आवाहन

पर्यटन पुनरुज्जीवनासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा; काश्मीर आयकॉनचा भावनिक संदेश

marathinews24.com

पुणे – काश्मीर आणि महाराष्ट्र यांचे नाते केवळ पर्यटनापुरते मर्यादित नसून ते आपुलकी, विश्वास आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे, असे मत काश्मीर आयकॉन संघटनेने व्यक्त केले आहे. पुण्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात काश्मीर आयकॉनने पुणेकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत काश्मीर पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन केले आहे. यावेळी काश्मीर आयकॉनचे व्यवस्थापकीय संचालक नासिर शाह, संचालक मीर अन्वर, अथेर यामीन, शोकत पख्तून आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा – सविस्तर बातमी 

काश्मीर आयकॉनच्या वतीने सांगण्यात आले की, महाराष्ट्राने नेहमीच काश्मिरी बांधवांना आपुलकीने स्वीकारले आहे. ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत हजारो काश्मिरी कारागीर व व्यापारी महाराष्ट्रात येतात आणि येथील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. हा केवळ व्यवसायाचा संबंध नसून परंपरा, जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

२२ एप्रिल रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला मोठा भावनिक व आर्थिक फटका बसला आहे. मात्र, अशा कठीण काळात महाराष्ट्राने नेहमीच काश्मीरच्या पाठीशी उभे राहत आधार दिला असल्याचे काश्मीर आयकॉनने अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर काश्मीर पुन्हा एकदा पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असून, या पर्यटन पुनरागमनाचे नेतृत्व पुणेकरांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“इतर कोणी गेले नाही तरी पुणेकर काश्मीरला जातील,” असा ठाम विश्वास व्यक्त करत “चला… चला काश्मीर!” हा भावनिक संदेश देण्यात आला. चिनार वृक्षांची शोभा, केशराची सुवर्णशेती आणि अतिथीदेवो भवः ही काश्मीरची समृद्ध परंपरा पुणेकरांची आतुरतेने वाट पाहत असल्याचे काश्मीर आयकॉनने सांगितले.

पुणेकरांच्या एकतेच्या, माणुसकीच्या आणि संवेदनशीलतेच्या भावनेला सलाम करत काश्मीरला आपले दुसरे घर मानून पुन्हा एकदा भेट देण्याचे आवाहन काश्मीर आयकॉनच्या वतीने करण्यात आले

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×