Breking News
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभजैव विविधतेत कीटकांचे अस्तित्व महत्वाचे-ईशान पहाडेमहंमद रफी हे महान गायक अन उत्तम व्यक्तीही-मोहन जोशीशिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळाकन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्नगावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाईपोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळलामाजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेशतब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या कंपाउंडरला अटक

मोबाइल हिसकावणार्‍या दोघांना अटक, विश्रामबाग पोलिसांची कामगिरी

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी कारवाई 

marathinews24.com

पिंपरी : किराणा दुकानातील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या कंपाउडरला पोलिसांनी अटक केली. २० किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सहा तासात त्याला शिताफीने पकडले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

विविध नागरी समस्यांवर आमदार शंकर जगताप व आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक – सविस्तर बातमी 

यशवंत दिगंबर सूर्यवंशी (वय ३२, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे चाकण येथे किराणा दुकान आहे. फिर्यादी महिला ३ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दुकानात एकटी असताना संशयित दुकानामध्ये आला. चाॅकलेट आणि बडीशेप खरेदी करण्याचा त्याने बहाणा केला. महिलेच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन त्याने महिलेच्या गळ्यातील ५७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावले. त्यानंतर दुचाकीवरून तो चाकणच्या दिशेने पसार झाला. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताचा माग काढला. त्यासाठी २० किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. खेड तालुक्यातील बोरदरा गावाच्या हद्दीतील एका खासगी कंपनीजवळ संशयिताची दुचाकी आढळून आली. दुचाकीला मागची नंबरप्लेट नव्हती. तसेच पुढच्या नंबरप्लेटवर चिखल लावला होता. त्यामुळे दुचाकीचा नंबर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत नव्हता.

पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून दुचाकीमालकाचा शोध घेतला असता एका रुग्णालयाशी संबंधित डाॅक्टरचे नाव पुढे आले. डाॅक्टरकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करणारा कर्मचारी संबंधित दुचाकी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कर्मचारी खासगी कंपनीमध्ये गेला असल्याचेही डाॅक्टरांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खासगी कंपनीतून संशयित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

संशयिताकडून दुचाकी व २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एक लाख ८० हजार रुपये किमीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सहा तासात या गुन्ह्याची उकल केल्याने युनिट तीनच्या पोलिसांचे कौतुक होत आहे. सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक सुनील जावळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top