Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलचा समारोप

शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण

marathinews24.com

पुणे – नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’ हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी संवाद, पुणे आणि वृद्धी रिॲलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलचा रविवारी (दि. ३१) समारोप झाला. ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’ असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी ‌‘नाचून नाही, तर वाचून‌’च गणेशोत्सव साजरा करू असा निर्धार केला.
बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, श्रीगणेशाच्या चित्रांचे प्रदर्शन यानिमित्ताने कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात भरविले होते. प्रदर्शनाला असंख्य पालकांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.

पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी – सविस्तर बातमी

बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. यात पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धांची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण कलादालनात झाल्यानंतर पारितोषिक वितरण बालसाहित्यकार राजीव तांबे, वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा आणि संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. राजीव तांबे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी गोष्टी सांगत संवाद साधला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना दाद द्या, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला. शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या अभिनव उपक्रमाचे अमोल शहा यांनी कौतुक केले. या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करीत मुलांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे नवी उर्जा मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

सुनील महाजन म्हणाले, बाल गणेश फेस्टिव्हलचे यंदाचे पहिलेच वर्ष असले तरी कोथरूड परिसरातील जवळपास तीस शाळांमधील पाच हजार विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. यंदाचा प्रतिसाद बघता पुढील वर्षीपासून शहर पातळीवर उपक्रम राबविण्याचे नियोजन करू. अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये, सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत, सहसंवाद पुणेच्या केतकी महाजन-बोरकर, छत्रपती संभाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मानकर, देवेंद्र भिडे, दिपाली गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×