Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन

प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने रॅलीची होणार सुरुवात

marathinews24.com

पुणे – सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता भिडेवाडा, बुधवार पेठ, पुणे येथे संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुरोगामी चळवळीतील डीकास्ट झालेले डॉ. आनंद करंदीकर – सविस्तर बातमी

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून या संविधान रॅलीची सुरुवात करण्यात येणार आहे. ही रॅली भिडेवाडा – लाल महाल – फडके हौद – दारूवाला पूल – १५ ऑगस्ट चौक – जुनी जिल्हा परिषद मार्गे पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ससून रुग्णालयासमोर, पुणे स्टेशन येथे पोहोचणार असून तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप होणार आहे.

रॅलीमध्ये समाज कल्याण विभाग व बार्टी, पुणे येथील सर्व अधिकारी-कर्मचारी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य, तृतीयपंथी व्यक्तींसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच तृतीयपंथी व्यक्ती आणि विविध सामाजिक क्षेत्रातील संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नागरिकांनी संविधान रॅलीत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल मंगल अशोक लोंढे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×