Breking News
अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमारउच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावाउद्योजकतेला बळ, स्वावलंबनाला दिशा! – विशेष लेखपुणे व्यापाऱ्यांच्या जिएसटी प्रश्नांसाठी भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकारपुण्याच्या विकासात अपयशी ठरलेल्या ‘पीएमआरडीए’ला टाळे ठोकण्याची वेळभरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलतरोजगार महाकुंभ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजनकात्रज-कोंढवा रोडवर भरधाव वाहनाने शाळकरी मुलींना उडवलेपुण्यात नशाखोरांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरलापोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

बिबवेवाडीत भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

ठेकेदाराविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करुन न देता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मिथुन नारायण चव्हाण (वय ३४, रा. महावीरनगर, सुखसागरनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार हरिनरसिंग राठोड (रा. जगताप डेअरीजवळ, कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यांची पत्नी श्रीदेवी (वय २१, मूळ रा. किनीमोड तांडा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हिने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात एका घराचे बांधकाम सुरू होते. हे काम ठेकेदार राठोड याला देण्यात आले होते. भिंत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली. राडारोड्याखाली सापडून बांधकाम मजूर चव्हाण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम मजुराच्या सुरक्षेविषयक उपाययोजना न करणे, सुरक्षाविषयक साधने उपलब्ध न करुन दिल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×