पोलीस मित्र संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र पोलीस दलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पोलीस मित्र संघटनेकडून केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी निवेदन दिले आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणाची ८ लाखांची आर्थिक फसवणूक – सविस्तर बातमी
आमदार गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलीस दलाविषयी नुकतेच आक्षेपार्ह वक्तव्य केले. राजकीय नेत्यांचा सभा, आंदोलन, निदर्शनाच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवतात. बंदोबस्तामुळे राजकीय नेत्यांचे कार्यक्रम सुरळीत पार पाडतात, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पोलीस दलाविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार गायकवाड यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास जास्त आहे. काही वेळा पोलीस कामाची वेळ संपल्यानंतर कर्तव्य बजावितात. पोलिसांच्या कामाचे स्वरुप २४ तास असते. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांच्या कामाचे तास जास्त आहेत. करोना संसर्ग काळात पोलिसांनी चोख काम केले. पोलिसांमुळे महाराष्ट्र सुरक्षित आहेत, असे कपोते यांनी निवेदनात नमूद केले आहे.