Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोयत्याचा धाक दाखवून दाम्पत्याला शिवीगाळ, आरोपीला अटक

मोटारचालक डाॅक्टरांना मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा

आंबेगाव पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – भांडणाचा राग मनामध्ये धरून कोयत्याच्या धाकाने दाम्पत्याला शिवीगाळ करून वाहनाचे नुकसान करणार्‍याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध क्रिमिनल अ‍ॅक्टप्रमाणे आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आंबेगाव खुर्दमधील भोलेनगरात घडली आहे. विशाल शिवाजी शेळके (वय ३० रा. भोलेनगर, आंबेगाव खुर्द)असे अटक केलेल्याचे नाव आहे.

खडकवासल्यात ‘हिट अँड रन’ मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा पती आणि आरोपी विशाल शेळके यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच भांडणाच्या रागातून आरोपी विशालने कोयता घेउन तक्रारदाराचे घर गाठले. त्याठिकाणी हातातील कोयत्याचा धाक दाखवून दाम्पत्याला शिवीगाळ केली. त्यांच्या गाडीवर लोखंडी हत्यार मारून वाहनाचे नुकसान केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी कोयता हवेत फिरवला. याप्रकरणी पोलीस अमलदार नीलेश जमदाडे तपास करीत आहेत.

बालेवाडीत फ्लॅटमधील दोन लॅपटॉप चोरीला

पुणे- फ्लॅटच्या दरवाजाचे लॅच उघडून चोरट्यांनी ८५ हजारांचे दोन लॅपटॉप चोरून नेले आहेत. ही घटना १६ मे रोजी सकाळी साडेसहा ते आठच्या सुमारास बालेवाडीतील यशोदा चौकातील भाग्य अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी बालेवाडीत राहणार्‍या तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण बालेवाडीतील भाग्य अपार्टमेंटमध्ये राहायला आहे. १६ मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी फ्लॅटचा दरवाज्याला लॅच लावले होते. त्यावेळी चोरट्याने दरवाजाचे लॅच काढून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या घरातील ८५ हजार रूपयांचे दोन लॅपटॉप चोरून नेले आहेत. याप्रकरणी पोलीस अमलदार शिंगे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×