Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

अपघातानंतर मदतीच्या बहाण्याने दाम्पत्याला लुटले

भरदिवसा सराफाची दागिन्याची बॅग पळवली

कोंढव्यातील टिळेकरनगरमधील घटना

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वार दाम्पत्याची दुचाकी घसरून अपघात झाल्यानंतर त्यांना मदतीचा बहाण्याने तरुणाच्या गळ्यातील ७५ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली. चोरट्यांनी दुचाकी चावी काढून पसार झाल्याची घटना कोंढव्यातील टिळेकरनगर भागात घडली. तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तब्बल ५० पेक्षा जास्त घरफोड्या करणारा सराईत गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा पत्नीसह कोंढवा बुद्रुक भागात राहायला आहेत. दोघेही १८ जूनला कामानिमित्त बाहेर गेले होते. दुचाकीवरुन रात्री दहाच्या सुमारास ते घरी जात होते. टिळेकरनगर परिसरातील श्रीराम चौकात खड्ड्यात त्यांची दुचाकी घसरली. दोघेजण खाली पडल्यानंतर त्यांना मदतीच्या बहाणा करून चोरटे तेथे आले. मदतीचा बहाणा करुन चोरट्यांनी तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. त्यानंतर त्यांच्या दुचाकीची चावी घेउन चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करत आहेत.

पीएमपीएल प्रवासी महिलेची दागिने लंपास

पीएमपीएल बसप्रवासात महिलेच्या हातातील ७० हजार रूपये किंंमतीची सोन्याची पाटली कटरने कापून नेल्याची घटना १८ जूनला घडली आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवारी (१८ जून) दुपारी कात्रज येथील पीएमपीएल बस स्थानकाकडून येवलेवाडीकडे जात होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने कटरने महिलेच्या हातातील ७० हजारांची बांगडी कापून नेली. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×