Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

तब्बल ५० पेक्षा जास्त घरफोड्या करणारा सराईत गजाआड

तब्बल ५० पेक्षा जास्त घरफोड्या करणारा सराईत गजाआड

३० लाखांचे दागिने जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – घरफोडीचे तब्बल ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला साथीदारांसह पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३० लाखांचे ३५ तोळे सोने आणि दोन किलोग्रॅम चांदी जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा पोलीस स्थानकाच्या पथकांनी त्यांना अटक केली.

चोरटा नुकताच चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता. चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (वय ३२, रा. चाफेकरनगर, चिंचवडगांव) असे सराईताचे नाव आहे. त्याचे साथीदार धनंजय हरीष काळे (वय २०,भारतनगर,चिंचवडगांव), दीपक शिवाजी मेंदगे (वय ३८, रा. कर्जत, जि. रायगड) वैâलासचंद्र धगनलाल जाट (वय ४०, रा. वाशी) यांना अटक केली आहे. ज्येष्ठ महिलेने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिषाने फसवूणक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला लोणवळ्यात एकट्याच राहायला आहेत. २५ मे रोजी त्या मुलीकडे कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसराते गेल्या होत्या. ९ जूनला त्यांच्या घरात चोरी झाली असल्याची माहिती त्यांना शेजार्‍यांनी दिली. त्यानंतर त्या मुलीसह लोणावळामध्ये आल्या असता, घराचे कुलूप तोडले असल्याचे आढळले. त्यांच्या घरातून ४७ तोळे सोन्याचे दागिने, दोन किलोग्रॅम चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. पावसाळा सुरू झाल्यानंतर लोणावळा भागात चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.

पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. भाडेतत्वावरील बंगले, तसेच रहिवासी घरांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. गुन्ह्याचा पोलिसांकडून समांतर तपास करण्यात आला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. घटना रात्रीच्या वेळी घडल्याचे तपासात उघडकीस आले. हे चोरटे घरफोडी करून लोणावळा रेल्वे स्थानक आणि तिथून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने गेल्याचे समोर आले.

घरफोडी सराईत चोरटा चंद्रकांत माने याने केल्याची माहिती खबर्‍याने पोलिसांना दिली. तो साथीदारासह वडगाव मावळ येथे असल्याची माहिती मिळाली. वडगाव मावळ भागात जुना मुंबई पुणे महामार्गावर पावसात झाडाखाली साथीदार धनंजय काळे याच्यासह माने थांबला होता. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. चौकशीत त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले. तपासात त्याने दोन साथीदारांच्या मदतीने चोरलेल्या ऐवजाची विक्री केल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३४ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, २ किलो चांदी असा ३० लाख एक हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजेश रामाघरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सहायक निरीक्षक राहूल लाड, उपनिरीक्षक रमेश भिसे, उपनिरीक्षक सुर्यकांत वाणी, पोलीस कर्मचारी राहुल पवार, सागर नामदास, धिरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडगे, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, उपनिरीक्षक मुकुंद कदम, अंमलदार संदिप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांनी केली आहे.

सराईत चोरटा, ५० हून अधिक गुन्हे

माने हा सराईत चोरटा असून त्याच्या विरुद्ध ५० हून आधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. तो चोरी करताना नेहमी वेगवेगळे साथीदार सोबत नेत होता. त्याच्याविरुद्ध कर्नाटक, चेन्नई, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर हद्दीत गुन्हे दाखल आहेत. १५ ते २० दिवसांपूर्वीच चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून तो जमीनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा लोणावळा परिसरात चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×