Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

मोहजालात अडकवून खंडणी उकळणारे दाम्पत्य गजाआड

मोहजालात अडकवून खंडणी उकळणारे दाम्पत्य गजाआड

भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – व्यावसायिकासह उद्योजकांना मोहजालात अडकवून खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले. याप्रकणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.  प्रताप रमेश जाधव (वय ४५), पल्लवी प्रताप जाधव (वय २८, दोघे रा. भिंताडेनगर, आंबेगाव, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

महिलेवर लैंगिक अत्याचार, उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पतीपासून विभक्त झाली आहे. २०२४ मध्ये आरोपी जाधव दाम्पत्याशी तिची ओळख झाली होती. त्यानंतर महिला जाधव दाम्पत्याकडे राहायला आली. महिलेने आरोपींकडून दोन लाख रुपये दरमहा पाच टक्के व्याजाने घेतले. व्याज आणि मुद्दल असे मिळून महिलेने जाधव दाम्पत्याला तीन लाख ६० हजार रुपये परत केले. त्यानंतर आरोपींनी महिलेला धमकावून आणखी पैशांची मागणी केली. गेल्या वर्षी २५ ऑगस्ट रोजी आरोपी प्रताप जाधव याची पत्नी पल्लवी ही कामानिमित्त घराबाहेर पडली. तेव्हा आरोपी प्रतापने महिलेवर अत्याचार केले. महिलेने पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी जाधव दाम्पत्याने तिला धमकावले. छायाचित्रे, तसेच चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली.

ऑक्टोबर २०२५ मध्ये जाधव दाम्पत्याने बारामतीतील एका उद्योजकावर खोटा दाखल करण्यास महिलेला सांगितले. खोटी तक्रार दिल्यास २० ते २५ लाख रुपये, तसेच बारामतीत सदनिका देण्याचे आमिष अरोपींनी महिलेला दाखविले. महिलेने खोटी तक्रार देण्यास नकार दिला. आरोपी जाधव दाम्पत्याने उद्योजक, व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची तक्रार महिलेने नुकतीच पोलिसांकडे दिली. पोलिसांनी तपास करुन जाधव दाम्पत्याला अटक केली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक निरीक्षक स्नेहल थोरात, उपनिरीक्षक निलेश माेकाशी यांनी ही कारवाई केली.

‘आरोपी जाधव दाम्पत्याने मोहजालात अडकवून अनेकांकडून पैसे उकळल्याची माहिती तपासात मिळाली आहे. आरोपी प्रताप आणि त्याची पत्नी पल्लवी यांनी घटस्फाेट घेतला आहे. घटस्फोट घेतल्यानंतर दोधे एकत्र राहत होते. आरोपींनी अशा पद्धतीने पैसे उकळले असल्यास त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी’, असे आवाहन पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×