Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

महिलेवर लैंगिक अत्याचार, उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव

भांडणात मध्यस्थी अंगलट, तरूणावर वार

१० लाखाच्या खंडणीची मागणी, ब्लॅकमेलर दाम्पत्याला बेड्या

marathinews24.com

पुणे – शहरातील उच्चभ्रु, प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योजकांना जाळ्यात खेचल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. प्रताप रमेश जाधव (वय ४५), पल्लवी प्रताप जाधव (वय २८, दोघे रा. भिंताडेनगर, राघवनगर आंबेगाव) अशी अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

‘यापुढे कोणत्याही पक्ष कार्यलयासमोर आंदोलनास परवानगी नाही- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी

फिर्यादी महिला पतीपासून विभक्त राहते. २०२४ मध्ये फिर्यादीचा आरोपी पल्लवी आणि प्रताप यांच्यासोबत ओळख झाली होता. काही दिवसानंतर फिर्यादी आरोपी दाम्पत्यासोबत एकत्र राहत होत्या. त्यावेळी तिने त्यांच्याकडून २ लाख रुपये दरमहा पाच टक्के व्याजाने घेतले होते. व्याज आणि मुद्दल असे मिळून आरोपींना ३ लाख ६० हजार रुपये परत दिले. त्यानंतरही आरोपी त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी करत होते. २५ ऑगस्ट २०२५ मध्ये, पल्लवी घरातून बाहेर गेली होती. त्यावेळी प्रतापने जबरदस्तीने फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

महिला तक्रार देण्यासाठी पोलिसात निघाल्या असता, दोघांनी त्यांना थांबून ठेवले. तिच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपी पल्लवीने प्रतापला फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त केले. प्रतापने दुसऱ्यांदा फिर्यादींवर लैंगिक अत्याचार केला. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो काढले.

दोघा आरोपींनी फिर्यादींना ऑक्टोबर २०२५ मध्ये बारामती येथील एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यास सागितले. त्याबदल्यात फिर्यादींना बारामतीत एक सदनिका आणि २५ लाख रुपये देण्याचे प्रलोभन दाखविले. फिर्यादींच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी व्यवसायिकाविरुद्ध खोटी तक्रार देण्यास नकार दिला. त्यावेळी दोघा आरोपींनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तिचे फोटो व्हायरल करण्याचे धमकावून उलट त्यांच्याकडेच १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. फिर्यादींनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी लैंगिक अत्याचार, सावकारी अधिनियमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून पल्लवी आणि प्रताप या दाम्पत्याला अटक केली. पल्लवी हिने उच्चभ्रु, प्रतिष्ठित व्यक्तींना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून खंडणीस्वरुपात पैसे स्वीकारल्याचे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे,सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या पथकाने केली.

अटक आरोपी दाम्पत्याने जर अशाप्रकारे कोणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळले असतील तर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. तपासात या दोघांनी अनेकांना अशाचप्रकारे लुबाडल्याचे समोर आले आहे. दोघे आरोपी पती-पत्नी असून, त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर देखील हे दोघे एकत्र राहत होते.

– मिलींद मोहीते, पोलिस उपायुक्त पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×