Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

शासकीय आदेश धुडकाविणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा

मतदार नोंदणीत काम करण्यास नकार

marathinews24.com

पुणे – मतदार नाेंदणी मोहिमेत शासकीय आदेशाचे उल्लंघन करुन काम करण्यास नकार देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या एका शिक्षाकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रवींद्र हरिश्चंद्र थोपटे (रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्राम महसूल अधिकारी अमोल बारहाते (वय ३२) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक स्मारकात चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोपटे हे शिक्षक आहेत. मतदार यादी पडताळणीचे काम थोपटे यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यांची मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी (बुथ लेव्हल ऑफिसर) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, थाेपटे यांनी हे काम करण्यास नकार दिला. शासकीय आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस फौजदार भोसले या प्रकरणाता तपास करत आहेत.

जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थिती लावणाऱ्या हडपसर येथील फुरसुंगी भागात असलेल्या एका शाळेतील सात शिक्षकांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×