Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक स्मारकात चोरी

पोलिसांकडे तक्रार दिल्याने डोक्यात दगड घातला

दानपेटीतील रोकड चोरणारे तीन अल्पवयीन ताब्यात

marathinews24.com

पुणे – आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसरातील दानपेटी फोडून रोकड चोरणाऱ्या तीन अल्पवयीनांना खडक पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलीस शिपाई कृष्णा गायकवाड यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चारचाकीच्या धडकेने महिला गंभीर जखमी; चालक फरार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील मामलेदार कचेरीच्या परिसरात क्रांतीकारी उमाजी नाईक यांचे स्मारक आहे. खडक पोलीस ठाण्याच्या आवारापासून काही अंतरावर हे स्मारक आहे. सोमवारी (२५ मे) पहाटे साडेचारच्या सुमारास स्मारकाच्या आवारातील दानपेटी उचकटून तीन अल्पवयीनांनी पाच हजार १६० रुपये चोरले. पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस हवालदार केंगार तपास करत आहेत.

महिलेकडून १२ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास

घरकामास ठेवलेल्या महिलेने सदनिकेतून १२ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना खडकी भागाताील एका सोसायटीत घडली. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी घरकाम करणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीतील रेंजहिल्स भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. आरोपी महिला त्यंच्याकडे घरकामास होती. तक्रारदार महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून तिने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा १२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चाेरला. कपाटातील ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. घरकाम करणाऱ्या महिलेने दागिने चोरल्याचा संशय महिलेने फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×