Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

चारचाकीच्या धडकेने महिला गंभीर जखमी; चालक फरार

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील तुळापूर-मरकळ रस्त्यावर भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने पायी चालणाऱ्या महिलेेला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही पाय, खांदा आणि हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. अपघातानंतर जखमी महिलेला मदत न करता चालक वाहनासह फरार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. सोमेश पंकज कडूसकर (वय २८, व्यवसाय सिक्युरिटी गार्ड, सध्या रा. मरकळ, खेड, मूळ रा. सावेडी प्रेमदान हडको, अहिल्यानगर) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवसाढवळ्या डोळ्यात स्प्रे मारून २६ लाखांची रोकड पळवली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळापूर-मरकळ रोडवरील श्रेयश वॉशिंग सेंटरजवळ जयवंतनगर परिसरात २३ मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार यांची आई रस्त्याच्या कडेला पायी चालत असताना अज्ञात चालकाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना समोरून धडक दिली. अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर मार बसला असून दोन्ही पायांना गुडघ्याजवळ फ्रॅक्चर झाले आहे. तसेच डावा खांदा, हाताची बोटे आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर चालकाने जखमी महिलेला कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. तक्रारदार यांच्या आईवर उपचार झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×